‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानांतर्गत शहरात स्वयंम् संरक्षण शिबिर

सावदा ता. रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानांतर्गत शहरातील आं.ग.म.हायस्कुल येथे महीला व मुली स्वयंम् संरक्षण शिबिर संपन्न झाले. यावेळी दहावी व बारावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यीना रोख बक्षीस तर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थीनीं व महिलांना आर्थिक मदत करण्यात आली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्हा ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियाना अंतर्गत माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन, भाजप जिल्हा अध्यक्ष आ. राजूमामा भोळे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, बेटी बचाओ बेटी पढाओ राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके, महाराष्ट्र प्रदेश संयोजिका डॉ. शुभा पाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली महीला व मुली स्वयंम संरक्षण शिबिर आयोजित करण्यात आले.

त्याप्रसंगी सृष्टी मेमोरियल ट्रस्टतर्फे समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी मुलींना व महिलांना आर्थिक मदत करण्यात आली. तसेच ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियाना अंतर्गत नयनाताई टेकवानी यांच्यातर्फे दहावीतून व बारावी विज्ञान व कला विभागातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यीना रोख बक्षीस वितरण करण्यात आले.

त्याप्रसंगी आचार्य सुरेशराज मानेकर शास्त्री यांनी मार्गदर्शन केले. सावदा पोलिस स्टेशनचे ए.पी.आय देविदास इंगोले यांनी मुलींनी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजेंद्रभाऊ चौधरी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’च्या जिल्हा संयोजक सारीका चव्हाण यांनी केले. कार्यक्रमचे सूत्र संचालन नंडू पाटील यांनी केले; तर आभार प्रदर्शन महेश अकोले यांनी केले.

मुलींना स्वरक्षणाचे प्रक्षिशण बी.आनंद कुमार यांनी दिले. या प्रसंगी उपस्थितांमध्ये आं.ग.म.हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री सपकाळे, सृष्टी मेमोरियल ट्रस्टच्या संचालिका प्रतिभा किशोर परदेशी, वर्षा संतोष परदेशी, भारतीय जनता पार्टीचे सावदा शहर अध्यक्ष जे.के.भारंबे, जेष्ठ कार्यकर्ते सुरेश चौधरी, किशोर परदेशी, सरचिटणीस संतोष परदेशी, सरचिटणीस महेश अकोले, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सागर चौधरी, युवा मोर्चा सावदा शहर अध्यक्ष सर्वेश लोमटे, तुषार चौधरी, पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थीनींची उपस्थिती होती.

Protected Content