राजभवनला घेराव घालण्यासह करणार जेलभरो आंदोलन – नाना पटोले यांची घोषणा

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत असल्याचे म्हणत त्याविरोधात शुक्रवारी राजभवनला घेराव घालण्यासह जेलभरो आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

उद्या शुक्रवार, दि. ४ ऑगस्ट रोजी मुंबईत सकाळी ११ वाजता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली हँगिंग गार्डन ते राजभवन असा मोर्चा काढून राजभवनला घेराव घातला जाणार असून त्यानंतर जेलभरो करण्यात येणार आहे. या संदर्भात राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयी स्थानिक नेते आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवतील. अशीही माहिती काँग्रेसने दिली आहे.

याविषयी नाना पटोले म्हणाले की, “पेट्रोल, डिझेल, एलपीसी गॅस, सीएनजी, पीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. महागाईने जनता त्रस्त असताना केंद्र सरकारने दूध, दही, पनीर, आटा, तेल, तूप यासह जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. मोदी सरकारने जीएसटीतून शाळकरी मुलांनाही सोडले नाही, शालेय वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयात उपचार घेण्यावरही जीएसटी भरावा लागणार आहे. अतिवृष्टीमुळे विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान असून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.अशा मागण्या नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केल्या आहेत.

Protected Content