सेवा फाउंडेशनच्या मागणीनंतर महेलखेडी ते कोरपावली रस्त्याच्या साईडपट्टयाच्या कामांना प्रारंभ

यावल, प्रतिनिधी । काँग्रेस सेवा फाउंडेशच्या दणक्याने महेलखेडी ते कोरपावली काँक्रीट रस्त्याच्या साईडपट्ट्याच्या कामास रविवार ९ ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला आहे.

महेलखेडी ते कोरपावली क्राँकीट रस्ता साईडपट्ट्यां दोन दिवसात भरा अन्यथा आंदोलनास सामोरे जा असा इशारा सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांना जळगाव जिल्हा काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांनी एका निवेदनाद्वारे दिला होता. त्याची तात्काळ दखल घेत आज यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाला सुरुवात केली. यामार्गावर दोघ बाजुस साइडपट्टया अभावी वारंवार अपघात होत असल्याने अखेर सदरचे कामपुर्ण झाले असुन यामुळे परिसरातील शेतकरी शेतमजूर वाहनधारक व सामान्य जनतेने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांनी ‘लाईव्ह ट्रेंड न्युज’ चे विशेष करून कौतुक करून आभार मानले जात आहे.

Protected Content