आंतरशालेय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत बियाणी पब्लिक स्कूल विजयी

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव हॉकी संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतर शालेय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत १७ वर्षा आतील मुलं आणि मुलींमध्ये भुसावळ येथील बियाणी पब्लिक स्कूल विजयी झाले आहे.

आज गुरूवार, दि. ४ ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात १७ वर्षा अतिल मुला. मुलींच्या संघात आंतर शालेय नेहरू चषक हॉकी स्पर्धा घेण्यात आले. या स्पर्धेत मुलींचे एकुण ४ संघ तर मुलांचे पाच संघांचा सहभाग होता. यात मुलींच्या संघामध्ये भुसावळ येथील बियाणी पब्लिक स्कूल विजयी ठरली; तर उपविजेतेपद पारोळा येथील बोहरा सेंट्रल स्कूल यांनी पटकवले. तर मुलांच्या संघामध्ये विजेतेपद भुसावळ येथील बियाणी पब्लिक स्कूल तर उपविजेतेपद बी झेड उर्दू हायस्कूल भुसावळ यांनी पटकवले

विजयी झालेल्या संघांना जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली पाटील आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, हॉकी जळगाव चे फारुक शेख, स्पोर्ट्स हाउस चे आमीर शेख आदी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हॉकी प्रशिक्षक अरविंद खांडेकर यांनी तर आभार प्रदर्शन लियाकत अली सैयद यांनी केले.

Protected Content