भुसावळातील पंचशिल नगरात नाले साफाईला सुरूवात

भुसावळ प्रतिनिधी । पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदाही पंचशिल नगरात नाले सफाईच्या कामाला आजपासून सुरूवात करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, दरवर्षी गटारी प्लास्टिक कचरा आणि इतर वस्तूंनी तूडूंब भरलेल्या असतात. अश्यातच पावसाचे पाणी आल्यानंतर गटारीतील पाणी रस्त्यावर आल्याने नागरीकांना त्रास सहन करावा लागतो. शहरातील पंचशिल नगरात तुडूंब भरलेल्या गटारी साफसफाई करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासनू वंचित बहूजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. मुख्याधिकारी यांना पंचशील नगरात आणून वार्डाच्या समस्यांची जाण करून दिली मुख्याधिकारी साहेबांनी ही सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

नगर परिषद चे नव नियुक्त आरोग्य सभापती म्हणून मा.दिनेश राठी सर यांची नियुक्ती होताच , वंचीतच्या मागणीला तातडीने समजावून घेत त्यांनी ही पंचशील नगरात नागरी सुविधा देण्यासाठी तत्परता दाखवली होती. या सर्वाचा परिणाम असा झाला की या वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी च पंचशील नगरात नाले सफाई ला प्रारंभ झाला.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्याहस्ते नारळ वाढवून सुरुवात करण्यात आली. यावेळी आरोग्य सभापती प्रा. दिनेश राठी, भुसावळ नगर परिषदचे अधिकारी गौरव अहिरे, वसंत राठोड, प्रदीप पवार व लाला देवकर, भिमराव तायडे, देवदत्त मकासरे भुसावळ शहर महासचिव वंचित बहुजन आघाडी यांची उपस्थिती होती.

Protected Content