‘हतनूर’चे सगळे दरवाजे उघडले ; सतर्कतेचा इशारा

0f7d72311f966f7f78c2b21e6b759729

रावेर, प्रतिनिधी | जळगाव पाटबंधारे विभागच्या कार्यकारी अभियंत्यांनी कळवल्यानुसार आज सायंकाळी ५.०० वाजेच्या सुमारास हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे संपूर्ण उघडूण्यात आले असून धरणातून २१८००० क्युसेक्स प्रति सेकंद या वेगाने पाणी तापी नदी पात्रात सोडण्यात आले आहे.

 

तसेच हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे मुक्ताईनगर, भुसावळ, यावल, रावेर, चोपडा, अमळनेर या तालुक्यातील तापी नदी काठावरील गावातील रहिवाशांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे.

Protected Content