विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील समस्या सोडविण्याबाबत विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन

stud........

यावल प्रतिनिधी । येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परीषदेच्या जिल्हा शाखेच्या वतीने आज दि. 29 जुलै रोजी जिल्यातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वस्तीगृहातील विविध समस्याबाबतचे निवेदन जिल्हाध्यक्ष दारासींग पावरा व महेंद्र पावरा यांच्यासह आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांना देण्यात आले आहे.

चोपडा जिल्हा जळगाव येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाचा निर्वाह भत्ता, डीबीटी आणि शैक्षणीक सहलीची रक्कम तात्काळ मिळावी, मुलींच्या वस्तीगृहात रिक्त असलेली लिपीकाची जागा तात्काळ भरावी, जळगाव येथील एम.जे.महाविद्यालय व बी. ॲड महाविद्यालयातील आदिवासी मुलींना चालु वर्षाची शैक्षणिक शिष्यवृत्ती तात्काळ मिळावी, शासनाच्या आदेशानुसार वस्तीगृह, व आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोई-सुविधा पुरवण्यात याव्यात, वैजापुर ता. चोपडा येथील शासकीय आदीवासी आश्रम शाळेतील होणारा दुषीत पाणीपुरवठा त्वरीत बंद करण्यात यावा यांच्यासह अन्य मागण्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आला आहे. निवेदन देतांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष दारासींग पावरा, महेंद पावरा, रंजना पावरा, सुनिता पावरा, सोनाली पावरा, रेखा पावरा, वनिता वळवी, मनिता पावरा, सरला पावरा, मोहीनी बारेला, रविना बारेला, फुलवंती पावरा, रिया पावरा व सुहिनता बारेला आदी उपस्थीतीत होते.

Protected Content