साकेगावच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील साकेगाव येथील तब्बल ७ कोटी ३५ लक्ष रूपयांच्या निधीची तरतूद असणार्‍या पाणी पुरवठा योजनेचे आज ना. गिरीश महाजन आणि ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भूमिपुजन करण्यात आले.

 

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी साकेगाव येथे जलजीवन मिशनच्या अंतर्गत ७ कोटी ३५ लक्ष रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेचे कार्यान्वयन हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आज या योजनेचे भूमिपुजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. गिरीश महाजन तर उदघाटक म्हणून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे, भाजप शहराध्यक्ष परिक्षीत बर्‍हाटे, जिल्हा दूध संघाचे प्रशासक अजय भोळे, माजी पंचायत समिती सभापती वंदनाताई उन्हाळे, माजी जि.प. सदस्य डॉ. वसंतराव खारखंडे, समाधान पवार, नगरसेवक पिंटू ठाकूर, सरपंच सौ. योगिता विष्णू सोनवणे, उपसरपंच आनंदा ठाकरे, प्रितीताई पाटील,बाजार समिती संचालक संजय पाटील, प्रमोद सावकारे आदींसह ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Protected Content