रेस लावलेल्या कारने बालकाला उडविले : मेहरूण ट्रॅकवरील भयंकर घटना

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगावातील रस्ते तर मृत्यूचे सापळे बनलेले आहेत, पण आता मेहरूण ट्रॅक सारख्या शांत भागातही वाहनांचा वेग जीवघेणा बनल्याचे दिसून आले आहे. अशीच एक भयंकर घटना आज घडली.

जळगाव शहरातील मेहरून ट्रॅकवर भरधाव कारने ११ वर्षाच्या सायकलवरील मुलाला उडवल्याची घटना घडली. अपघात एवढा भीषण होता की, कारणे जोरदार धडकल्यानंतर सायकल झाडावर अडकली होती. तर मयत मुलगा हा फुटबॉल सारखा वर उडाला होता.

विक्रांत संतोष मिश्रा (वय -११) हा आई व वडील यांच्यासह एकनाथ नगर येथे वास्तव्याला आहे. विक्रांत हा मेहरून तलावा जवळील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये चौथी मध्ये शिकत होता आज रविवार २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजता दरम्यान असल्यामुळे त्याला शाळेला सुट्टी होती. दरम्यान त्याचा काकाचा मुलगा सुनील जितेंद्र मिश्रा यांच्यासोबत मेहरून ट्रॅकवर सायकलवर फिरण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याच वेळी मेहरून ट्रॅकवर दोन कार यांची रेस लावण्यात होती. यामध्ये एमएच १९ बीयू ६६०६ या क्रमांकाच्या कारने विक्रांत याला जोरदार उडवले. या अपघातात विक्रांत हा चेंडू सारखा वर उडून खाली पडला होता. तर त्याची सायकल झाडाला अडकली होती या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

त्याचा मृतदेह घेऊन तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची प्रचंड गर्दी जमली होती| दरम्यान रेस करणार्‍या कारमधील तीन जणांना अटक केल्याचे वृत्त आहे.

Protected Content