शेतकरी विरोधी निर्णयाच्या निषेधार्थ ठाकरे गटाचे धरणे आंदोलन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत ॲग्रीकल्चरल इन्शुअरंस कंपनी (ए. आय. सी.) मार्फत सततच्या पावसाने कापुस व इतर पिकांचे झालेल्या नुकसानी पोटी विमा कंपनीकडून अत्यल्प नुकसान भरपाई मिळाली. एकुण १४ हजार १८ शेतकऱ्यांपैकी फक्त ६ हजार शेतकऱ्यांना तुटपुंजी भरपाई मिळाली. बाकी शेतकरी ऑनलाईन तक्रार करण्यासाठी गेले असता कंपनीचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑनलाईन तक्रार दाखल करु शकले नाहीत. विमा कंपनीची ही तांत्रीक चुक होती तरी विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी. या रास्त मागण्यांसंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नैतृत्वाखाली आज १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत पाचोरा तहसिल कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत, तालुका प्रमुख शरद पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख रमेश बाफना, युवा सेना जिल्हा उपप्रमुख संदिप जैन, महिला आघाडीच्या तिलोत्तमा मौर्य, मंदाकिनी पारोचे, जयश्री वाणी, कुंदन पंड्या, भरत खंडेलवाल, नाना वाघ, अतुल चौधरी यांचेसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या एकदिवसीय धरणे आंदोलना प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. दरम्यान आंदोलनास्थळी तहसिलदार कैलास चावडे, अॅग्रीकलचर विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक कुंदन बारी, उपजिल्हाप्रमुख मिलिंद अहिरे, चाळीसगावचे प्रतिनिधी राहुल पाटील, पाचोरा प्रतिनिधी समाधान मोरे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकुन घेत वरिष्ठांना अहवाल सादर करुन २ मार्च रोजी सर्व समस्यांबाबत योग्य ती कारवाई करण्याच्या संदर्भात बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.
पाचोरा तालुक्यातील एकुण शेतकरी १४ हजार ९८, शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी भरलेली रक्कम – २ कोटी ५२ लक्ष ६९ हजार ८२८ रुपये, राज्य सरकारचा हिस्सा रक्कम – १ कोटी ३४ लाख ६० हजार ६०६ रुपये, केंद्र सरकारचा हिस्सा रक्कम – १ कोटी ३४ लाख ६० हजार ६०६ रुपये, विमा कंपनीकडे जमा झालेली एकुण – रक्कम – ५ कोटी २१ लक्ष ९१ हजार ४० रुपये, शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून मिळालेली भरपाई रक्कम – ३ कोटी ३६ लक्ष ९९ हजार २६७ रुपये, विमा कंपनीने कमविलेल्या नफ्याची रक्कम – १ कोटी ८४ लक्ष ९१ हजार ७७९ रुपये, एकुण संरक्षीत रक्कम – ५२ कोटी २९ हजार २९४ रुपये, ह्या तफावतीच्या निषेधार्थ तसेच कापुस, सुर्यफूल, तुर, सोयाबीन या सर्व पिकांना विदर्भातील धान पिकाप्रमाणे प्रति क्विंटल २ हजार रुपये बोनस द्यावा. या शेतकऱ्यांच्या हितार्थ मागण्यांसंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नैतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ पाचोरा तहसिल कार्यालयासमोर १५ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

रक्ताच्या ठस्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येणार
केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाच्या निषेधार्थ आज १५ फेब्रुवारी रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नैतृत्वाखाली एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असुन त्या सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी वैशाली सूर्यवंशी, दिपकसिंग राजपूत, अरुण पाटील, रमेश बाफना, भरत खंडेलवाल, अॅड. मंगेश गायकवाड (वडगाव अंबे), शरद पाटील, राजेंद्र पाटील, देविदास पाटील, धर्मराज पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विनोद बाविस्कर, अभय पाटील, अतुल चौधरी (लोहटार), शुभम राजपुत (अंतुर्ली खु”), प्रेमचंद पाटील (राजुरी), समाधान पाटील (कुरंगी), किशोर बाफना (कोल्हे), ज्ञानेश्वर पाटील (वाघुलखेडा), प्रमोद पाटील (वाघलखेडा), धरमसिंग पाटील (दहिगाव संत), मिथुन वाघ (बांबरुड राणीचे), चंद्रकांत पाटील (जारगाव), रमेश पाटील (नांद्रा), अतुल चौधरी (लोहटार) यांचेसह असंख्य शेतकऱ्यांनी मागण्यांसंदर्भात रक्ताचे ठसे उमटविलेले निवेदन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.

Protected Content