सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे यांची उद्यापासून सेवा उपलब्ध

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । गेल्या आठ वर्षात विविध प्रकारच्या कर्करोगावर दोन हजाराहून अधिक शस्त्रक्रिया करणारे सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे यांची उद्या (दि. १७) फेब्रुवारीपासून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात सेवा सुरु होत आहे. कर्करोगाच्या रुग्णावर लॅप्रोस्कोपीद्वारेही ते उपचार करतात.

कर्करोगाच्या शस्त्रक्रियांमधील त्यांचा अनुभव दांडगा असून सर्व प्रकारचे कौशल्य वापरुन ते रुग्णसेवा करतात. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात प्रत्येक आठवड्यातील दर गुरुवारी डॉ.अतुल भारंबे यांची सकाळी ९ ते १२ या वेळेत ओपीडी राहणार आहे. गेल्या आठ वर्षापासून कर्करोग तज्ञ म्हणून ते सेवा देत असून आतापावेतो २ हजाराहून अधिक शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या केल्या आहेत. कर्करोगावर उपचार आता गोदावरीतच उपलब्ध होत असल्याने रुग्णांना मुंबई, पुणे जाण्याची आवश्यकता राहणार नसून त्यामुळे रुग्णांचा वेळ आणि श्रम दोन्हींची बचत होणार आहे. तरी येत्या गुरुवारपासून सुरु होणार्‍या कर्करोग ओपीडीचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या प्रकारच्या कर्करोगावर उपचार

मुखाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, स्वरपेटीचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, जठराचा कर्करोग, गर्भाशयासह अन्ननलिकेचा, आतड्यांचा, किडनी, मूत्रमार्ग, स्वादुपिंड तसेच पित्ताशयाच्या कर्करोगावर डॉ.भारंबे हे उपचार करतात.

डॉ.अतुल भारंबे यांचा परिचय 

जामनेर तालुक्यातील फत्तेपूर हे मुळ गाव असलेले डॉ.अतुल गजेंद्र भारंबे यांनी डी वाय पाटील मेडिकल कॉलेज, कोल्हापूर येथून एमबीबीएसचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई येथील जसलोक हॉस्पीटलमधून डीएनबीची पदवी जनरल सर्जरीतून पूर्ण केली. सुपर स्पेशालिटी आणि कॅन्सर सर्जरीचे शिक्षण भरत कॅन्सर हॉस्पीटल, सुरत येथून प्राप्त केले.

 

Protected Content