घरासमोरून डॉक्टरच्या कारची चोरी; पोलीसात तक्रार

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मोहन नगरातील वृंदावन गार्डन समोरून एका डॉक्टरांची स्विप्ट कारची चोरी झाल्याची घटना रविवारी ९ जुलै रोजी पहाटे साडे तीनवाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात कारच्या चोरीबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

जळगाव शहरातील मोहन नगरातील वृंदावन गार्डन जवळ डॉ. साजीद दगडू तडवी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांच्याकडे स्विप्ट कार क्रमांक (एमएच १९ सीयू ०२८०) आहे. गुरूवार ६ जुलै रोजी रात्री डॉ. तडवी यांनी त्यांची कार त्यांच्या घरासमोर आलेल्या झाडाजवळ पार्क करून लावली होती. रविवारी ९ जुलै रोजी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांची कार चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर डॉ. तडवी यांनी कारचा सर्वत्र शोध घेतला परंतू काहीही माहिती मिळाली नाही. यानंतर रविवारी ९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार देण्यात आली आहे. यासंदर्भात अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content