रोहिणी खडसे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या दोन दिवसांपुर्वी ढगफुटीमुळे बोदवड तालुक्यातील कुऱ्हा हरदो, धोनखेडा आणि शेवगा या परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यात शेतातील पिक आणि घरांची पडझड झाल्याने नुकसान झाली. या नुकसानग्रस्त भागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रोहिणी खडसे-खेवलकर यांनी पाहणी केली.

 

गेल्या दोन दिवसांपुर्वी बोदवड तालुक्यासह इतर भागांमध्ये ढगफुटी झाली होती. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर या परिसरात नुकसान झाल्याचे पहायला मिळाले. शिवाय बोदवड  तालुक्यातील  कुऱ्हा हरदो, धोनखेडा आणि शेवगा या परिसरातील शेत शिवारात शेतातचे नुकसान, घराची पडझड, ठिंबक नळ्या वाहून गेल्या, शेतांचे बांध फुटून शेतातील माती वाहून गेली. यामुळे मोठे नुकसान झाले. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे-खेवलकर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Protected Content