यावल तालुक्यात संततधार पाऊस : पर्जन्यमान शतकाच्या उंबरठ्यावर

yaval rain

यावल, प्रतिनिधी | तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासुन सर्वत्र पावसाची संततधार सुरू असुन, या दमदार पाऊसामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधान व आनंद व्यक्त करण्यात येत आहे. या आधी झालेल्या पावसामुळे तालुक्यात पर्जन्यमान हे शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.

 

या भागात समाधानकारक पाऊस होत नसल्याने याचा गंभीर परिणाम शेती पिकांची नासाडी व केळी बागायत कापून फेकण्यापासुन तर पिण्याच्या पाण्यावरही झाला होता. परिणामी यावलसह रावेर, सावदा, फैजपुर, या शहरातील नगरपालीकांसाठी वरदान ठरलेल्या हतनुर धरणातील जलसाठाही यंदा उन्हाळ्यात संपुष्टात आल्याने मोठे संकट उभे राहिले होते. यावलसह सर्वत्र यंदा पावसाने आपली कृपादृष्टी शेतकरी बांधवांपासुन तर सर्वसामान्य नागरिकांवर ठेवल्याने ग्रामीण व शहरी क्षेत्रातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वरुणराजाने आपली संततधार अशीच सुरु ठेवुन शतकी गाठल्यास नदी नाल्यांना पुर आलेला दिसेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. आजपर्यंत (दि.४) झालेल्या पावसाची सरासरी ६५ टक्के इतकी नोंद झाली असुन अजूनही पावसाची रिपरिप सुरूच आहे.

Protected Content