अवैध गांजा विक्री करणाऱ्या तरूणाला अटक

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | बेकायदेशीर गांजाची विक्री करताना एक तरूण शहरातील नागदरोड येथे सापडून आल्याने शहर पोलिसांनी चार किलो गांजासह त्या तरूणाला अटक केली आहे. याप्रकरणी शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील नागदरोड परिसरातील झोपडपट्टीत राहणारा शोएब उर्फ माया शेख (वय-२४) हा तरूण काल रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास बेकायदेशीर वनस्पतीचे शेंडे उग्र वास असलेला गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने नागदरोडवर असल्याची गुप्त माहिती शहर पोलीसांना मिळाली. त्यावर शहर पोलीसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्याजवळ कापडी पिशवीत ३० हजार रुपये किं.चा १ किलो नऊशे ९० ग्रॅम गांजा व दुसऱ्या पिशवीत ३० हजार रुपये किं.चा १ किलो नऊशे ९६ ग्रॅम गांजा असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि विशाल टकले हे करीत आहे.

Protected Content