दोन चिमुरड्यांचा देखील विचार न करता आईने घेतला चुकीचा निर्णय !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मोंढाळे रोडवरील राहत्या घरात गळफास लावून २५ वर्षीय विवाहितेने आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना  १० मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असुन घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोंढाळे रोडवरील रहिवाशी देविदास पाटील हे शहरातील हाॅटेलमध्ये वेटरचे काम करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते. दरम्यान दि. १० मार्च रोजी सकाळी देविदास पाटील हे नेहमी प्रमाणे आपल्या कामावर निघुन गेले. त्यांच्या पत्नी दिपाली देविदास पाटील ह्या घरी आपल्या तीन वर्षाचा अल्पेश व १२ महिन्याची चिमुकलीसह होत्या. दरम्यान अल्पेश हा घरा बाहेर खेळत असतांना घरी गेला असता अल्पेश यास आई छताला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळुन आल्याने चिमुकल्या अल्पेशने शेजाऱ्यांना गळ्या भोवती हात लावुन इशारा करत आई..आई..असे सांगताच शेजाऱ्यांनी घरात जावुन बघितले असता दिपाली ही छताला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळुन आली. घटनेची माहिती मिळताच मा. नगरसेवक बापु हटकर हे घटनास्थळी दाखल होवून त्यांनी तात्काळ पाचोरा पोलिस स्टेशनला माहिती दिली. दरम्यान पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे, पोलिस काॅन्स्टेबल राहुल बेहरे, विनोद बेलदार, योगेश पाटील व रुग्णवाहिका चालक बबलु मराठे हे घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळा पंचनामा करून रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांच्या मदतीने दिपाली हिचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांच्या खबरीवरुन पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे ह्या करीत आहे. दिपाली हिने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले ? याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

Protected Content