भडगावात ‘जागर स्वच्छतेचा’बाबत जनजागृतीपर पथनाट्य

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव नगरपरीषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातुन ‘जागर स्वच्छतेचा’ हा जनजागृतीपर पथनाट्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी पोवाड्याच्या माध्यमातुन स्वच्छतेविषयक माहीती शहरवासीयांना दिली.

यावेळी मुख्याधिकारी रविंद्र लांडे, पालिकेचे स्वच्छतादूत प्रा.डाॅ.दिनेश तांदळे,आरोग्य निरीक्षक तुषार नकवाल, माजी नगरसेवक डाॅ.विजयकुमार देशमुख, योजना पाटील, ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष विलास नेरकर आदि उपस्थित होते. शाहीर शिवाजीराव पाटील यांनी आपल्या सुरेल अन् भारदस्त आवाजातुन ‘अस्वच्छतेला हटुवून सारे स्वच्छ भारत पाहूया’ या गिताच्या माध्यमातुन त्यांनी स्वच्छतेचा जागर केला. त्यांनी पथनाट्य आणि गिताच्या माध्यमातुन स्वच्छतेचे महत्व नागरीकांना पटवून दिले. शहरात विविध गर्दीच्या ठीकाणी हू पथनाट्य सादर करण्यात केले. प्रत्येक ठीकाणी उपस्थती नागरीकांना स्वच्छतेची शपथ ही देण्यात आली. शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या सोबत नामदेव सोन्नी, बाबुराव मोरे, जितेंद्र भांडारकर, रामसिंग राजपूत, गोकुळ पाटील, सुरज राऊळ, कुणाल राऊळ, मिलिंद शेंडगे,भूषण पवार, भागवत महाजन यांचा समावेश होता

Protected Content