रेल्वे हद्दीतील पूलावरुन नागरिकांना ये-जा करू द्या (व्हिडीओ)

जळगाव, प्रतिनिधी । शिवाजी नगर, गेंदालाल मिल परीसरातील नागरीक जिव धोक्यात घालून रेल्वे ट्रॅक ओलांडून शहरात येतात. तरी रेल्वे पूल (दादरा) पायी ये-जा करण्यासाठी खुला करण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जळगाव महानगरतर्फे रेल्वे स्टेशन प्रबंधक ए.एम. अग्रवाल यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

स्टेशन प्रबंधक ए. एम. अग्रवाल यांच्याशी चर्चा करतांना आमदार राजूमामा भोळे यांनी उत्तरेकडील पुर्ण परिसरातील किमान २० ते २५ हजार जनतेचा उदरनिर्वाहाराठी पुर्वेकडुन पश्चिमेकडे ये-जा होत असते. तरी आपल्या स्टेशन मधील मेन ब्रिज पुल बंद असल्या कारणाने या परिसरातील जनतेचे अतोनात हाल होत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. तरी त्यांना काम -धंदयाला जायला खुप त्रास सहन करावा लागत असुन त्यांना ये- जा करणाऱ्या रेल्वेच्या मोकळया पटरी वरुन जीव मुठीत धेउन ये-जा करावी लागत असून तेथे त्यांची जिवीत हानी सुध्दा होउ शकते. तरी जनतेच्या जीवाशी न खेळता सदरच्या ब्रिज मोकळा करुन पायी रहदारीस ब्रिज सुरु करावा अशी मागणी केली.

यावेळी जनतेस सहकार्य करा अन्यथा ब्रिज पायी रहदारीस मोकळा न झाल्यास जळगाव जिल्हा ओ.बी.सी. मोर्चा महानगर यांच्या वतीने तीव्र स्वरुपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यासंदर्भातील निवेदन संबधीत नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी सुध्दा मागे दिले होते. तरी त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही. त्याकरीता आज निवेदन देत आहे.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, भाजपा महागराध्यक्ष दिपक सूर्यवंशी, ओबीसी आघाडी जिल्हा महानगर अध्यक्ष जयेश भावसार, सरचिटणीस विशाल त्रिपाठी,महेश जोशी, नगरसेवक महेश चौधरी तसेच ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख केशव नारखेडे, सरचिटणीस योगेश पाटील, संजय शिंपी, कोषाध्यक्ष भानुदास, शिवाजी नगर मंडल अध्यक्ष नवनाथ दांरकुडे, पवार,दिनेश पूरोहीत, विजय बारी, फीरके,चंदु महाले,रमेश जोगी, शांताराम गावडे,अनुसूचित जाती अध्यक्ष लता बाविस्कर महीला आघाडी सदस्य वैशाली सोलंकी, कल्पेश ठिवरे ,गुंजन पाटील, चंद्रकांत तायडे, बाळकृष्ण कखपुरे, राजेंद्र मराठे, सूनिल माळी, नितीन पाटील आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/410652770332810/

Protected Content