साकेगाव येथे संकुलस्तरीय बास्केट बॉल स्पर्धा उत्साहात

2a6a82be f0cb 4f1c 98d3 be1b6d7ae106

भुसावळ, प्रतिनिधी | तालुक्यातील साकेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयात आज (दि.२४) संकुल स्तरीय बास्केट बा्ँल स्पर्धा उत्साहात पार पडली.
या स्पर्धांमध्ये अकोला संकुलातील नांदेड, परभणी, वाशिम, अकोला, हिंगोली, जळगाव अशा सहा जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धांचे उद्घाटन आमदार सावकारे यांच्याहस्ते खेळध्वजाचे ध्वजारोहण करुन करण्यात आले.

या स्पर्धांसाठी पंच म्हणून गोपाल जोनवाल, गिरीष खुशलाणी, विक्की तरटे, रुपेश तायडे, विजय पाटिल, विक्की तायडे व सहकारी पंचमंडळाने निःपक्षपातीपणे निर्णायक भुमिका पार पाडत यशस्वीरित्या सामन्यांचा निकाल लावला.कार्यक्रमात प्राचार्य आर.आर. खंडारे यांनी प्रास्ताविक केले तर सुत्र संचालन श्री. पांडे यांनी केले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून भुसावळ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष रमण भोळे, ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्राचार्या श्रीमती मीना कटलार, केंद़िय विदयालयाचे ग्रंथपाल श्री.खोब्रागडे उपस्थित होते.शेवटी उपप्राचार्य पी.आर. कोसे यांनी आभार प्रदर्शन केले.

Protected Content