ऊसतोड कामगार व वाहतूक ठेकेदारांचे बेमुदत उपोषण (व्हिडीओ)

bemudat uposhhan

भुसावळ प्रतिनिधी । येथील मधुकर साखर कारखानाचे ऊसतोड मजूर व वाहतूक ठेकेदार यांचे गळीत हंगाम २०१३ पासून ते २०१९ पर्यंतचे 9 कोटी रुपयांची थकबाकी बाकी असून ही रक्कम त्वरित मिळावी, अन्यथा तोपर्यंत कारखान्यातील साखर व अल्कोहोल बाहेर जाऊ देणार नाही. असा पवित्रा घेत ऊसतोड कामगार व वाहतूक ठेकेदारांनी साखर कारखान्यासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या 8 वर्षापासून मधुकर साखर कारखान्यात पडलेले ऊस तोडणी व वाहतूक मजूर व ठेकेदार यांचे 9 कोटी रुपये थकीत आहेत. वारंवार प्रयत्न करूनही रक्कम मिळत नसल्याने अखेर ऊस तोड कामगार व ठेकेदारांनी साखर कारखान्या बाहेर बेमुदत उपोषण सुरू केले असून शासनाकडून मधुकर साखर कारखान्याला थक हमी मिळत नसल्याने हा गुंता तयार झाला आहे. तसेच साखर कारखाना थकबाकी देण्यास असमर्थ ठरत आहे. यासंदर्भात कारखाना संचालक मंडळ सोबत ऊसतोड वाहतूक ठेकेदार यांमध्ये चर्चाही झाली. मात्र त्यात कुठलाही तोडगा न निघालेला नाही आहे. जोपर्यंत थकबाकी मिळणार नाही, तोपर्यंत कारखान्यातून साखर अल्कोहोल बाहेर जाऊ देणार नाही. असा पवित्र अखेर उपोषणकर्त्यांनी घेऊन कारखाना बाहेरच बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Protected Content