मेडीकल प्रतिनिधीची दुचाकी लांबविली; बाजारपेठ पोलीसात तक्रार

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील टिंबर मार्केट येथून मेडीकल रिप्रेझेंटेटीव्ह यांची दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची घटना १ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी मंगळवार १६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, राहुल हरी चौधरी (वय-४३, रा. गुजर कॉलनी भुसावळ) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून फार्मासिटिकल कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते काम पाहतात. १ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता भुसावळ शहरातील टिंबर मार्केट येथे कामाच्या निमित्ताने दुचाकी (एमएच १९ सीए ९०२०) ने आले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी पार्क करून लावली. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर राहुल चौधरी यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु त्यांना दुचाकी मिळून आले नाही. अखेर मंगळवारी १६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन खबर दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश चौधरी हे करीत आहे.

Protected Content