भुसावळ शहर कोरोना हॉटस्पॉट बनल्याने कडक उपाययोजना करा ; नेमाडे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

 

भुसावळ, प्रतीनिधी । गृहमंत्री अनिल देशमुख यांना भुसावळ कोरोना हॉटस्पॉट होत असल्याने कडक उपाय योजना करण्याची मागणी राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केली.

गृहमंत्री देशमुख हे जळगाव येथून वाशिम येथे बुधवारी जातांना राष्ट्रीय महामार्गावर भुसावळ येथे त्यांना भुसावळ कोरोना हॉटस्पॉट होत असल्याबाबत माहिती देऊन उमेश नेमाडे यांनी निवेदन दिले.  निवेदनात श्री. नेमाडे यांनी सांगतिले की, भुसावळ हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ४९२ रुग्ण झालेले आहे. त्यापैकी १२१ पेशंट हे भुसावळात असून शहरात ११४ रुग्ण संख्या आहे. एकूणच जवळपास २५ टक्के रुग्ण संख्या एकट्या भुसावळात असून मृत्यु संख्या १८ झालेले असतांना मृत्युदर जिल्ह्यात सर्वाधिक आहे. रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असून या ठिकाणी विलगीकरण कक्षांत असुविधा आहेत. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. भुसावळ शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना झाली पाहिजे अशी मागणी उमेश नेमाडे यांनी केली.

Protected Content