सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात बंगालमध्ये , . मात्र नवरा कोण ? ; तेजस्वी यादव यांनी भाजपला फटकारले

 

कोलकाता : वित्तसंस्था । बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेता तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला   भाजपा इतका मोठा पक्ष आहे, पण सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन भाजपा बंगालमध्ये आली आहे. मात्र बोहल्यावर बसणारा नवरा कोण आहे? , असा प्रश्न त्यांनी विचारला .

 

 

. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंगाल दौऱ्यावर असलेल्या तेजस्वी यादव यांनी भाजपावर खरमरीत टीका केली आहे.

 

“ मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापेक्षा जास्त अनुभव असलेल्या एकातरी नेत्याचं नाव सांगून दाखवा. ज्यांना विधानसभेचा अनुभवच नाहीये तुम्ही त्यांच्याकडे सत्ता सोपवणार का?” असा सवाल तेजस्वी यांनी विचारला. बंगालमध्ये भाजपाकडे मुख्यमंत्रीपदाचा एकही उमेदवार नसल्याचं म्हणत तेजस्वी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं.

 

 

 

बिहार निवडणुकांबाबत बोलताना “आम्ही हरलो नाही तर आम्हाला हरवण्यात आलं, बिहारचं सध्याचं सरकार चोर दरवाज्यातून आलं आहे, बिहारची जनता ही बाब खूप चांगली समजते” असंही तेजस्वी म्हणाले. दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी तृणमूल काँग्रेससोबत गठबंधन करणार असल्याची चर्चा असतानाच राष्ट्रीय जनता दलाचे नेता तेजस्वी यादव यांनी सोमवारी तृणमूलच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा काय झाली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही, पण निवडणुकीत गठबंधनाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Protected Content