कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा ; बीडीओ दिपाली कोतवाल

 

रावेर, प्रतिनिधी । राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता निर्माणी झाली असून यापार्श्वभूमीवर ग्रामीण भागात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक गाव-पातळीवरील समितीने लक्ष घालावे. आठवडे बाजार, यात्रा, लग्न संमारंभ यावर पूर्णत्व बंदी आहे. कोणीही नियम मोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई,  दंड करा. कोरोनाप्रतिबंध नियम तोडणे  खपवून घेतले  जाणार नसल्याचा  इशारा गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी बैठकीत दिला. 

आज वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रावेर तालुक्यातील ग्रामीण भागाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कोरोना व्हायसर संदर्भात दिलेल्या आदेशाचे ग्रामीण स्तरावर अंमलबजावणी व्हावी याबद्दलच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी दिपाली कोतवाल पुढे बोलतांना म्हणाल्या की, गाव पातळीवर बाहेरुन आलेल्यांची अँटीजन टेस्ट बंधनकारक असल्याचे त्यांनी बैठकीत दिल्या आहे.

ग्रामीणस्तरावर कारवाईसाठी समिती गठित 

रावेर तालुक्यात सद्यास्थिती ४६ रुग्ण कोरोना बाधित आहे. यासाठी बिडिओ कोतवाल यांनी ग्रामस्तरावर सरपंच, पोलिस पाटील,ग्राम सेवक,आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका यांची समिती गठित करून गावात होणाऱ्या कार्यक्रम तसेच विनामास्क फिरणा-यांवर ही समिती दंड  करणार आहे. या समितीची आठवड्यातुन एक बैठक होणार आहे. 

अँटीजन टेस्टसाठी कॅम्प राबविणार: बीडीओ 

दरम्यान बैठकीत ग्रामीणस्तरावर वेग-वेगळ्या गावात यापुढे कोरोना व्हायरसचे रुग्ण शोधून काढण्यासाठी अँटीजन टेस्ट कॅम्प राबविण्यात येणार आहे. यात ज्यांना कोरोनाचे लक्षणे जाणवत असेल त्यांनी तात्काळ टेस्ट करून घ्यावी. ग्रामीण भागात सद्या १५ कन्टेंमेंट झोन असून या झोनमध्ये कोणीही फिरणार नाही याची ग्रामीण भागातील समितीने खबरदारी घेण्याचे सूचना केल्या.

पहिली बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे

रावेर तालुक्यात झालेल्या निवडणूकांमध्ये निवडून आलेल्या सर्व सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्याची कोरोना व्हायसर संदर्भात पहिलीच बैठक घेण्यात आली. यावेळी गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत मार्गदर्शन केले.

 

Protected Content