मराठा समाज आता ठोक मोर्चा काढणार : नानासाहेब जावळे पाटील (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी ।  केवळ मतांसाठी मराठा समाजाचा वापर राज्याच्या मागील भाजपा व विद्यमान महविकास आघाडी सरकारने  केला.  मराठा आरक्षणासंदर्भात राज्य  व केंद्र सरकार ऐकमेकांना दोष देत आहेत. त्यांच्या या राजकाणामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. यापुढे मराठा समाज मूक मोर्चा न काढता, हातात दंडूके घेऊन ठोक मोर्चा काढून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नानासाहेब जावळे पाटील यांनी  दिला.

अखिल भारतीय छावा संघटनेचा आरक्षणबाबत  दि. ५ जुलैपासून राज्य दौरा सुरु असून या दौऱ्या अंतर्गत जळगावात अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मागच्या भाजपा व आताच्या महाविकास आघाडी सरकारने केवळ मराठा समाजाचा वापर करीत आहे. महाविकास आघाडी सरकार देखील कोर्टात मराठा आरक्षणासाठी बाजू मांडण्यात कमी पडले. राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखविते, केंद्र सरकार राज्याकडे बोट दाखविते आणि दोन्ही कोर्टावर बोट ठेवतात. राज्या सरकार व केंद्र सरकारने एकत्र बसून कश्याप्रकारे मराठा समाजाला आरक्षण देता येईल यासाठी मार्ग काढला पाहीजे. अन्यथा यापुढे मराठा समाज मुक मोर्चा काढणार नाही, तर शिवाजी महाराजाची तलवार व दांडके घेवून रस्त्यावर उतरु असा इशारा देखील नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला.मराठा समाजाकडून सध्या राज्य दौरा सुरु आहे. दौरा झाल्यानतंर २५ऑगस्ट रोजी पुणे येथे बैठक आहे.  त्याठीकाणी आंदोलनाचा निर्णय घेतला जावून तारीख देखील निश्चित केली जाणार आहे. त्यानुसार मातोश्री किंवा मंत्रालयार मोर्चा काढणार आहोत. मोर्चासाठी प्रत्येक जिल्ह्यातून १० हजार मराठा बांधव येतील.३ ते ४ लाखाचा मोर्चा काढणार आहे. त्यावेळी आम्हाला गोळ्या घातल्या तरी मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही, अशी माहीती जावळे पाटील यांनी दिली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  भिमराव मराठे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रा. आर. व्ही. पाटील आदी उपस्थित होते.

तसेच आजच्या मेळाव्यात पंजाबराव काळे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष नंदू पाटील, जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील , जिल्हा अध्यक्ष राजू कुमावत , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष महिला आघाडी वंदना पाटील , महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष रेखा पाटील , शहर अध्यक्ष नाना महाले , व्यापार आघाडी सुरेश आबा , अॅड. सचिन पाटील, बापू पाटील,  किशोर पाटील, केतन पाटील, मनोज मोहिते, ईश्वर पवार, राहुल पाटील, विजय पाटील, अ.भा.छावा संघटनेचे सर्व तालुका अध्यक्ष, पदाधिकारी, मराठा सेवा संघाचे राम पवार व पदाधिकारी, मराठा क्रांति मोर्चाचे पदाधिकारी व समाज बांधव. उपस्थित होते. 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/428337911761782

Protected Content