दोन गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील बाजारपेठ पोलिसांना दोन गुन्ह्यात हवा असणार्‍या सलीम उर्फ घोडेवाले सिकंदर शेख या आरोपीला पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की, बाजारपेठ स्थाकात भाग गुरन १६४/२०१९ भा द वि कलम-३९५,आर्म ऍक्ट ३/२५ प्रमाणे दिनांक.०२.०३.२०१९ रोजी २३.१३ वाजता गुन्हा दाखल आहे यातील फिर्यादी मनीष रुपेश ठाकरे रा.खळवाडी भुसावळ यास गावठी कट्टा दाखवून ७००० रु जबरीने हिसकावून घेतले बाबत गुन्हा दाखल आहे
यासोबत भुसावळ बाजारपेठ पो स्टे भाग ५ गुरन १७१/२०१९ भादंवि कलम-३८४, ४५२,२९४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे दिनांक ०५.०३.२०१९ रोजी १३.२३ वाजता गुन्हा दाखल आहे. यातील फिर्यादी असणार्‍या महिलेस देह व्यापार करून पैसे कमवून दिले नाही याचे वाईट वाटून तिला धमकावून पाच हजार रूपयांची खंडणी मागून चापट बुक्क्यांनी मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्यात सलीम उर्फ घोडेवाले सिकंदर शेख (रा. दिनदयाल नगर भुसावळ) हा फरार झाला होता. दरम्यान, संबंधीत आरोपीबाबतची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाली होती. या अनुषंगाने त्याला घोडेपीर बाबा परिसरातुन ताब्यात घेण्यात आले आहे.

संबंधीत कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके,तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक अनिल मोरे, संदीप परदेशी,सहा.फौज.तस्लिम पठाण, पो.हे.कॉ.सुनील जोशी, जयराम खोडपे ,पो.ना.रविंद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, महेश चौधरी, पो.कॉ.विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, तुषार पाटील, ईश्‍वर भालेराव, प्रशांत परदेशी यांच्या पथकाने केली आहे.

Protected Content