फेसबुकवर आक्षेपार्ह मजूकर टाकणाऱ्या संशयितास अटक

जळगाव प्रतिनिधी । फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकून धार्मिक भावना दुखविल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी शोहेब मोहम्मद शेख सादीक (वय-32) रा. रामनगर, मेहरूण हे मंगळवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास फेसबुक चाळत असतांना संशयित आरोपी आशुतोष राणाप्रताप याने दोन समुहात तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह मजकूर टाकला. याप्रकरणी शोहेब यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात संशयित आरोपी आशुतोष राणा प्रताप याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, सतीश गरजे, इम्रान सय्यद, सचिन पाटील यांनी फेसबुक लोकेशनुसार संशयित आरोपी आशुतोष राणा प्रताप याला सुप्रिम कॉलनीतून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहे.

Protected Content