निर्भया प्रकरण : फाशी नको जन्मठेप द्या, पवनकुमारची सुप्रीम कोर्टाला विनंती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आपल्याला ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेत बदल करून ती आजन्म कारावास करावी, अशी विनंती निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चौथा दोषी पवन कुमार गुप्ता याने सुप्रीम कोर्टात एका क्यूरेटीव्ह याचिकेद्वारे केली आहे.

 

निर्भया प्रकरणातील दोषींना ३ मार्च रोजी त्यांना फाशी देण्यात येणार आहे. मात्र या प्रकरणातील दोषी पवनकुमार गुप्ता याने फाशीच्या शिक्षेत बदल करुन आपल्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशी विनंती सुप्रीम कोर्टाला केली आहे. पवन गुप्ताचे वकील ए. पी. सिंह यांनी ही माहिती दिली. दरम्यान, पवन गुप्ताची याचिका सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीदरम्यान फेटाळण्याची शक्यता आहे. असे झाले नाही, तर पवनचे वकील या डेथ वॉरन्टला स्थगिती द्यावी अशी मागणी करण्याची शक्यता आहे.

Protected Content