Home क्राईम दीड लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा

दीड लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा

0
34


जळगाव प्रतिनिधी । माहेरहून मालवाहू गाडी घेण्यासाठी दीड लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, ज्योती सुरेश ठाकूर रा. गेंदालाल मिल यांचे २० फेब्रुवारी १९९९ मध्ये राकेश पांडूरंग ठाकरे यांच्याशी लग्न झाले. लग्न झाल्यापासून आजपर्यंत मालवाहू गाडी घेण्यासाठी माहेरहून दीड लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करण्यास सुरूवात केली. छळसह मानसिक व शारिरीक त्रास देण्यास सुरूवात केली. याप्रकरणी पती राकेश ठाकरे, सासरे पांडूरंग ठाकरे, सासू सुमन पांडूरंग ठाकरे, जेठ राजू ठाकरे, जेठाणी आशा राजू ठाकरे, दिर तुषार ठाकरे, दिरानी ज्योती तुषार ठाकरे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास प्रदीप बडगुजर हे करीत आहे.


Protected Content

Play sound