पारोळा तालुक्यातील शेळावे केंद्रांची शिक्षण परिषद उत्सहात

1n

पारोळा, प्रतिनिधी । जि. प. उच्च प्राथमिक शाळा दगडी सबगव्हाण शाळेत शेळावे केंद्राची ६ वी शिक्षण परिषद २८ रोजी उत्साहात वातावरणात संपन्न झाली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी कविता सुर्वे तर प्रमुख पाहुणे म्हणुन शा. पो. आ. अधिक्षिका प्रिती पवार, गावाचे सरपंच नंदलाल पाटील, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष छोटु पाटील उपस्थित होते.

शिक्षण परिषदेचा उद्देश व प्रास्ताविक शाळेच्या ग्रेडेड मुख्याध्यापिका रत्ना भदाणे यांनी केले. शाळेच्या विदयार्थ्यांनीअभिनव असा ज्ञानकुंभात टाकलेली विषय लेखन केलेली चिठ्ठी काढली व त्यावर आपले विचार मांडले. यात सात विदयार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सचिन छोटु पाटील या विद्यार्थ्याने तर अगदी धीटपणे मराठी शाळेतच का शिकावे ? ही नाटयछटा सादर करून सर्वच उपस्थितांची मने जिंकली. त्याला कविता सुर्वे , प्रिती पवार, रत्ना भदाणे, मनवंतराव साळुंखे, रामेश्वर भदाणे यांनी प्रोत्साहन म्हणुन रोख बक्षिसे दिली. प्रत्येक शिक्षण परिषदे प्रमाणे याही कार्यक्रमात धाबे शाळेचे राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे यांनी एक आदर्श विदयार्थी व एक आदर्श विदयार्थीनीसह सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बक्षिस दिले .विशेष म्हणजे हे साहित्य प्रत्येक विद्यार्थ्याला कापडी पिशवित देऊन त्याच्यावर स्वहस्ते प्लास्टिक बंदीचे विविध संदेश लेखन करून दिले . तसेच उपस्थित सर्वांना कापडी पिशवीवर छापलेली लग्नाची पर्यावरणपूरक पत्रिका दाखवुन या पुढे अशाच पत्रिका छापण्याची विनंती व आवाहन केले. याप्रसंगी फेबुवारीतच इ १ लीची पटनोंदणी करुन बालकांना शाळेत दाखल केले म्हणुन राजवड शाळेच्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका पाकिजा पटेल , धाबे शाळेचे मुख्याध्यापक राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त मनवंतराव साळुंखे यांचा तर भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार प्राप्त धाबे शाळेचे वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील, शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे खेडीढोक, राज्य शिक्षिका पुरस्कार प्राप्त वंदना ठेंग मोहाडी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार रत्नाकर पाटील यांनी मानले . यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिकांसह सर्व शिक्षक शिक्षिकांनी परिश्रम घेतले .

Protected Content