खिरोदा अध्यापक विद्यालयात पर्यावरणपूरक गणपती मुर्ती कार्यशाळा

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील खिरोदा येथील अध्यापक विद्यालयात पर्यावरणपूरक गणपती मुर्ती बनविण्याची कार्यशाळा नुकतेच घेण्यात आले.

पर्यावरणाचे रक्षण व्हावे प्रदूषण टाळता यावे, ही आता काळाची गरज आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. या संकल्पनेतुन पर्यावरण पुरक गणपती तयार करावा व त्याचे पावित्र्य जपण्यात यावे म्हणून शाडू माती पासून गणपती तयार करणे कार्यशाळा घेण्यात आली. तज्ञ मार्गदर्शक म्हणून सप्तपुट ललित कला महाविद्यालया चे प्राचार्य अतुल मालखेडे  यांनी छात्रध्यापकांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रतिभा बोरोले व शिक्षकवृंद उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा. हेमांगी चौधरी , प्रास्ताविक बी.एन.बोरोले  व आभार अरुणा पदमे यांनी केले.

Protected Content