जळगावात लवकरच फुटबॉल लीग स्पर्धा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव क्रीडा संकुल येथे फुटबॉल संघटनांचे माध्यमाने जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लवकरच फुटबॉल लीग स्पर्धा व इतर खेळांच्या स्पर्धा घेण्यात येतील तसेच विविध खेळांची सेंटर सुरू करण्यात येईल असे नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी खेळाडूना आश्वासन दिले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा फुटबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय १९ वर्षातील फुटबॉल स्पर्धेचे उदघाटन आज रवी नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी त्यांचे प्रथमतः क्रीडांगणावर व खेळाडूंची संवाद साधला त्याबद्दल त्यांचे साने गुरुजी लिखित मराठीचे इस्लामी संस्कृतीचे पुस्तक देऊन स्वागत व सत्कार केले.

यावेळी फुटबॉल संघटनेच्या कार्याध्यक्ष प्रा डॉ अनिता कोल्हे,तालुका क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण, क्रीडा मार्गदर्शक सुजाता गुल्हाने व मीनल थोरात आदींची उपस्थिती होती.
फुटबॉल ला किक मारून व नाणेफेक करून नाईक यांनी स्पर्धेचे विधिवत उद्घाटन केले. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सॉफ्टबॉल राष्ट्रीय खेळाडू तथा राज्य क्रीडा मार्गदर्शक व ज्यांना शासनाने नुकतेच शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले ते किशोर चौधरी यांच्या हस्ते विजेते व उपविजेते संघांना चषक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी संघटनेचे सचिव फारुक शेख,डी एल हिंदी कनिष्ठ महाविद्यालयाचे आनंद पाठक व राजेंद्र कोळी रायसोनीचे जयंत जाधव क्रीडा समन्विका सुजाता गुल्हाणे, अडव्होकेट आमीर शेख व सेंट्रल रेल्वे चे नितीन डेव्हिड यांची उपस्थिती होती.

१९ वर्षातील मुलांच्या स्पर्धेचा निकाल

१. जी एच रायसोनी वि.वि डी डी एस जी डी चोपडा
२-०
२. डी एल हिंदी वि.वि प्रताप कॉलेज अमळनेर
२-०

उपांत फेरी

३. जी एच रायसोनी वि.वि इंद्राबाई ललवाणी
३-२ (पेनल्टी )
४. डी एल हिंदी वि.वि डॉक्टर झाकीर हुसेन
२-०

अंतिम सामना

५. डी एल हिंदी वि.वि जी एच रायसोनी
३-०
स्पर्धेचे पंच

आकाश कांबळे ,निलेश पाटील, धनंजय धनगर, सुरज सपके,दीपक सस्ते, संजय कांदेकर ,हर्षद शेख ,वसीम शेख ,आयान शेख, लोकेश मांजरेकर, सिद्धार्थ अडकमोल, कुलदीप पाटील, कौशल पवार.

Protected Content