Home क्राईम जळगावात तरूणाच्या हातातील मोबाईल अज्ञात दोन भामट्यांनी लांबविला

जळगावात तरूणाच्या हातातील मोबाईल अज्ञात दोन भामट्यांनी लांबविला

0
122

जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून पायी जाणाऱ्या प्रौढाच्या हातातून १७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल दुचाकीवरील अज्ञात दोन भामट्यांनी हिसकावून पळ काढल्याचा प्रकार रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळाली माहिती अशी की, भटु पंढरिनाथ वाणी (वय-५१) रा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला जळगाव हे नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवारी १८ फेब्रुवारी रोजी भटू वाणी हे बसस्थानकाजवळ मेसवर जेवण करण्यासाठी ७.३० वाजता गेले होते. जेवण करून ते रूमवर जाण्यासाठी स्वातंत्र्य चौक ते आकाशवाणी चौक दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून पायी जात असतांना मागून अज्ञात दोन चोरटे दुचाकीने येवून हातातील मोबाईल हिसकावून आकाशवाणी चौकाकडे पसार झाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Protected Content

Play sound