अतिरेक्यांच्या हल्ल्यात २ पोलीस शहीद

 

श्रीनगर: वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरच्या बाराजुल्ला परिसरात एके-47 सह मुक्तपणे संचार करणाऱ्य अतिरिक्यांनी पोलीस पार्टीवर हल्ला केला. अचानक बेछुटपणे झालेल्या या गोळीबारात बेसावध असलेले दोन पोलीस शहीद झाले.

 

हे दोन्ही पोलीस जम्मू-काश्मीर पोलीस दलातील आहे. या चकमकीनंतर पोलीस आणि सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेराव घातला असून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

 

कॉन्स्टेबल सुहैल अहमद आणि मोहम्मद युसूफ असं या दोन पोलीस शिपायांचं नाव आहे. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एक अतिरेकी मार्केटमध्ये घुसला आणि एका दुकानाच्या बाहेर उभं राहून त्याने दोन पोलिसांवर गोळीबार केला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली आहे. हल्ल्यानंतर हा अतिरेकी फरार झाला. दरम्यान पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. टीआरएफ या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

 

 

या पोलीस पार्टीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. त्यात एका अतिरेक्याच्या हातात एके-47 असून हा अतिरेकी मार्केटमध्ये फिरत असल्याचं दिसत आहे. सुरक्षा दलाने या सीसीटीव्ही फुटेजवरून अतिरेक्याची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते दोन अतिरेक्यांनी पोलिसांवर हल्ला केला. फायरिंग केल्यानंतर हे दोन्ही अतिरेकी घटनास्थळावरून तात्काळ फरार झाले.

 

या हल्ल्याची माहिती मिळता जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराचे जवान घटनास्थळी पोहोचले असून या परिसरात त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. शहीद झालेले पोलीस हे श्रीनगर एअरपोर्ट ते श्रीनगर शहर रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर तैनात होते. बाजूलाच बगात बाराजुल्ला पोलीस चौकीही आहे. सुरक्षा रक्षकांच्या म्हणण्यानुसार हे अतिरेकी कोणत्या तरी गल्लीतून आले आणि फायरिंग करून फरार झाले.

 

शोपियांमध्ये रात्री उशिरा दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक उडाली. ही चकमक आज सकाळपर्यंत सुरू होती. या चकमकीत तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं. यावेळी सुरक्षा दलाने अतिरेक्यांकडी मोठ्या प्रमाणावरील शस्त्रसाठा जप्त केला. या चकमकीनंतर आता संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. शोपियांमध्ये काही अतिरेकी लपल्याची माहिती मिळाली होती.

 

. शोपियांमध्ये चकमक सुरू असतानाच बडगाममध्येही सुरक्षा दल, पोलीस आणि अतिरेक्यांमध्ये जोरदरा चकमक झाली. यावेळी जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एसपीओ अल्ताफ अहमद हे शहीद झाले. या चकमकीनंतर संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे

Protected Content