गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील मेडिकल सर्जिकल विभागातर्फे २९ व ३० मे रोजी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. रोजगारक्षम होण्यासाठी उचलण्याची मुख्य पाऊले कोणती याबाबत सविस्तर माहिती दिली.

 

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मौसमी लेंढे, संचालक शिवानंद बिरादार, रजिस्ट्रार प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सेमिनार हॉलमध्ये कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी मोटिव्हेशनल स्पीकर आफताब अझीम व सिनीयर पर्सेनॅलिटी डेव्हलपमेंट इंस्ट्रक्टर आकांक्षा सिंग यांनी ऑनलाईनद्वारे मार्गदर्शन केले. बीएसस्सी नर्सिंगच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. दोन दिवसीय कार्यशाळेसाठी मेडिकल सर्जिकल विभागाच्या प्रमुख प्रा.मनोरमा कश्यप, प्रा.रश्मी टेंभुर्णे यांच्यासह स्टाफने मेहनत घेतली

Protected Content