…तर केंद्रसंचालक आणि सहा.पर्यवेक्षकावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेय : नितीन उपासनी

 

जळगाव, प्रतिनिधी । दहावीचा मराठीचा पहिला पेपर अवघ्या १५ मिनिटात फुटल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोड येथे घडली असल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी आपण शिक्षण अधिकाऱ्यांना चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती, नाशिक बोर्डाचे उपविभागीय सचिव नितीन उपासनी यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना दिली आहे.

बोर्डाचे उपविभागीय सचिव नितीन उपासनी यांच्याशी लाइव्ह ट्रेंड्स न्यूजने संपर्क साधला असता त्यांनी असा कोणताही प्रकार घडल्याचा वृत्तास दुजोरा दिला नाही. दरम्यान, असा प्रकार घडला असल्यास केंद्र संचालक व सहाय्य्क पर्यवेक्षक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण अधिकारी बी. जी. पाटील यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

Protected Content