दिल्ली पोलिसांवर गोळीबार करणारा अटकेत

नवी दिल्ली । दिल्लीतील हिंसाचारात पोलिसांवर गोळीबार करणार्‍या शाहरूख या तरूणाला उत्तरप्रदेशातल्या शामली येथून अटक करण्यात आली आहे.

दिल्लीत उसळलेल्या दंगलीदरम्यान पोलिसांवर पिस्तुल रोखणार्‍या व्यक्तीला अटक करण्यात आलीय. लाल शर्टात दिसणार्‍या शाहरुखचा पोलिसांवर बंदुक रोखताना फोटो व्हायरल झाला होता. जाफराबाद परिसरात शाहरुखनं पोलिसांवर पिस्तुल रोखून धरण्यासह आठ राऊंडदेखील फायर केले होते. अटकेपासून वाचण्यासाठी त्यानं पिस्तुल चालवली आणि घटनास्थळावरून पळून गेला. यानंतर व्हिडीओ आणि छायाचित्रांच्या मदतीने या तरूणाचे नाव मोहंमद शाहरूख असल्याचे पोलिसांनी शोधून काढले होते. गोळीबार करणारा शाहरुखचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर तो आपल्या कुटुंबीयांसहीत फरार झाला होता. शाहरुखला उत्तर प्रदेशातील शामलीमधून अटक करण्यात आलीय. तर त्याचे कुटुंबीय मात्र अद्याप गायब आहेत.

Protected Content