केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केंद्रान ४ चार टक्क्यांची वाढ केली आहे. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयाला मंजुरी देण्यात आली. यापूर्वी ऑक्टोबर २०१९ मध्ये सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली होती. केंद्राने त्यावेळी महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यात आली होती. या निर्णयामुळे ५० लाख वेतनधारक कर्मचारी आणि ६२ पेन्शनधारकाना लाभ झाला. तर तब्बल १६ हजार कोटी रूपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडला होता.

Protected Content