सलमान खान लोकसभा निवडणूक लढणार?

salman

मुंबई (प्रतिनिधी) अभिनेता सलमान खान लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याविरोधात सलमानला मैदानात उतरवण्याचा काँग्रेसचा मानस आहे. त्यामुळे सलमानला इंदूरमधून उमेदवारी देण्याचा विचार कॉंग्रेस करत आहे. दरम्यान, सलमान खान किंवा काँग्रेसकडून अद्याप कुठलाही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

 

सुमित्रा महाजन या इंदूरमधून सलग आठव्यांदा खासदार आहेत. त्यामुळे भाजपकडून ही सीट खेचून आणण्यासाठी काँग्रेस जंग-जंग पछाडताना दिसत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी यापूर्वी सलमान खानचे नाव सुचवले होते. नुकतेच त्याला मध्य प्रदेश पर्यटन विभागाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले होते. सलमानचा जन्म मध्य प्रदेशचा आहे. कल्याणमल नर्सिंग होममध्ये सलमानचा जन्म झाला. त्यामुळे जन्मभूमीत सलमानला जनमत मिळेल, असा काँग्रेसचा अंदाज आहे. याआधी करिना कपूरला लोकसभा निवडणुकांच्या मैदानात उतरवण्याचा काँग्रेसचा इरादा असल्याचे वृत्त होते.

Add Comment

Protected Content