‘त्या’ नराधमाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महिलेवर कुर्‍हाडीने वार करून तिची क्रूर हत्या करणार्‍या नराधमाला न्यायालयाने आज पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

या संदर्भातील वृत्त असे की, काल सायंकाळी यावल शहरात एका महिलेचा खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी सदर मयत महिलेचा पती खलील जाकीर अहमद काझी (वय- ४३ धंदा- मजुरी रा. काझीपुरा यावल ) यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, जावेद युनुस पटल याचे तीन महीण्यापुर्वी त्याचे आणि माझी पत्नी नजीमा बानो काझी यांचेत भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन त्याने दिनांक २७ ऑगस्ट रोजी नजमा बानो काझी हिच्यावर कुर्‍हाडीने वार करून तिचा खून केला.

 

यानुसार जावेद युनुस पटेल याच्या विरोधात रात्री उशीरा भादंवि कलम-३०२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील संशयित आरोपी जावेद पटेल याला आज पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायधिश मनोज बनचरे यांनी  पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Protected Content