डॉ.बेंडाळे महाविद्यालयात ‘संशोधन पद्धती’ विषयावर एकदिवसीय एफ. डी.पी.चे यशस्वी आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात आय. क्यू. ए. सी., फॅकल्टी डेव्हलपमेंट कमिटी आणि संशोधन विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संशोधन पद्धती’ विषयावर एकदिवसीय ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ चे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गौरी राणे होत्या. कार्यक्रमाचे उदघाट्न आय. एम आर. महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. व्ही. पवार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.आर.जी.बावणे यांनी केले.यानंतर पहिल्या सत्रात डॉ. बी. व्ही.पवार यांनी ‘संशोधन प्रस्ताव कसे तयार करावे’ यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर द्वितीय सत्रात प्राचार्य डॉ. गौरी राणे यांनी ‘संशोधन पद्धती’ या विषयावर चर्चा करताना संशोधन आराखडा, संशोधनाची गरज, उपयुक्तता, संशोधनातील बदल, संशोधनातील बारकावे, संशोधनातील अडचणी, एकंदरीत संशोधन प्रक्रिया याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

भोजनानंतरच्या सत्रात डॉ.पराग नारखेडे यांनी ‘कला व वाणिज्य विद्या शाखेच्या संशोधन पद्धती’ या विषयावर बोलतांना रिसर्च जर्नल, रिसर्च पेपर, विविध संशोधनाची माध्यमे, शोधप्रबंध लेखन नियमांबद्दल सखोल मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे ‘विज्ञान विद्याशाखेतील संशोधन पद्धती’ या विषयावर वक्ते डॉ. व्ही. व्ही.गिते यांनी विज्ञान विषयातील संशोधनाविषयी नाविन्यपूर्ण मार्गदर्शन केले. यानंतरच्या सत्रात ‘संशोधन प्रकाशन मूल्ये’ या विषयावर वक्ते डॉ.विजय कंची यांनी प्लेगॅरिझम, इम्पॅक्ट फॅक्टर, सायटेशन,एच इंडेक्स तसेच संशोधन प्रकाशन झाल्यानंतर मूल्यमापनाच्या असलेल्या विविध बाबी आपल्या व्याख्यानातून स्पष्ट केल्या. कार्यक्रमाच्या समारोप सत्रात डॉ.सत्यजित साळवे, डॉ.सुहास पाटील डॉ. शीला राजपूत, प्रा. मिताली अहिरे, प्रा.तकदीस शेख, प्रा. चैताली चौधरी यांनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमात सर्व सहभागी प्राध्यापक बंधू-भगिनींना प्रमाणपत्र देण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा.रत्नप्रभा महाजन, डॉ.स्मिता चौधरी, डॉ.आर. जी.बावणे, उपप्राचार्य प्रो. व्ही. जे. पाटील, डॉ. पी. एन. तायडे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. हर्षाली पाटील,प्रा. डॉ.संजय रणखांबे,डॉ. शीला राजपूत, डॉ.स्मिता चौधरी डॉ. गणेश जेठवे, प्रा. योगीता सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमास प्राध्यापक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content