पाचोरा एस. टी. कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन

पाचोरा, प्रतिनिधी । संयुक्त कृती समितीतर्फे कामगारांनी आजपासून संपूर्ण राज्यभरात बेमुदत उपोषण सुरू केले असून पाचोरा आगारातील संयुक्त कृती समितीच्या वाहक, चालकांसह कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.

संयुक्त कृती समितीतर्फे पुकारण्यात आलेल्या उपोषणातील प्रमुख मागण्यांमध्ये महाराष्ट्र शासनात विलीनीकरण, वार्षिक वेतन वाढीचा दर २ टक्के ऐवजी ३ टक्के मान्य केल्याप्रमाणे लागु करण्यात यावा, राज्य शासना प्रमाणे महागाई भत्त्याचा दर २८ टक्के लागु करण्यात यावा, शासकीय नियमाप्रमाणे सण अग्रीम रक्कम १२ हजार ५०० रुपये लागु करण्यात यावा, दिवाळी भेट १५ हजार रुपये दिवाळी पुर्वी देण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत आहे. मागण्या मान्य न झाल्यास संयुक्त कृती समितीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा सुर यावेळी कामगारांमध्ये दिसुन आला. यावेळी ₹संयुक्त कृती समितीचा विजय असो”, “कोण म्हणतो देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही”, “कामगार एकजुटीचा विजय असो” अशा घोषणांनी उपोषणकर्त्या कामगारांनी परिसर दणाणून सोडला होता.

पाचोरा आगाराचे सुमारे ६ लाख रुपये उत्पन्न बुडणार – आगार प्रमुख निलिमा बागुल

संयुक्त कृती समिती जळगांव विभागाने संपूर्ण राज्यभरात बेमुदत उपोषण सुरू केले असून या उपोषणात पाचोरा आगार संयुक्त कृती समितीचे वाहक, चालक व कामगार सहभागी झाले आहेत. सकाळी ६ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत पाचोरा आगाराला प्रवाशी वाहतुकीतुन सुमारे ६ लाख रुपये उत्पन्न मिळत असते. दि. २८ रोजी सकाळ पासुनच उपोषण सुरू झाले असुन पाचोरा आगाराला दैनंदिन येणारे ६ लाख रुपये उत्पन्न बुडणार आहे. अशी माहिती पाचोरा आगार प्रमुख निलिमा बागुल यांनी लाईव्ह ट्रेंडचे प्रतिनिधी नंदु शेलकर यांचेशी बोलतांना सांगितले.

 

 

Protected Content