शाळा, कोचिंग क्लासेस उद्या पासुन ३१ मार्चपर्यंत असणार बंद

 

रावेर, प्रतिनिधी । कोरोना व्हायरसचा पादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने नगरपालिका हद्दीतील सर्व शासकीय,खाजगी शाळा तसेच कोचींग क्लासेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रावेर शहरात देखिल हा निर्णय अमलात येणार असून आजपासुन सर्व शाळा व क्लासेस येणाऱ्या ३१ मॉर्च पर्यंत बंद करण्याचा निर्णय खाजगी संस्था चालकांनी घेतला आहे.

जिवघेणा कोरोना वायरस पादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आता शाळा,कोचिंग क्लासेस येणाऱ्या ३१ मॉर्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेलता आहे. या निर्णयाची दखल घेत शहरातील सर्व संस्थाचालक व कोचिंग क्लासेसच्या मालकांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही यातील काहीनी शासनाचे पत्र मिळाल्या नंतर बंद ठेवणाऱ असल्याचे सांगत आहे

या शाळा असणार बंद

दि १७ मार्चपासुन रावेर शहरातील सर्व शासकीय शाळा तसेच खाजगी शाळा यामध्ये आदित्य इंग्लिश स्कूल,संत ज्ञानेश्वर प्राथमिक स्कूल, पोदार इंग्लिश स्कूल, स्वामी विवेकानंदन स्कूल, सरस्वती विद्या मंदिर,मॉडन इंग्लिश स्कूल, सरदार जी. जी. हायस्कूल, कमलाबाई र्गल्स हायस्कूल, मॅक्रो इंग्लिश स्कूल, डॉ. एन. एन. अकोले विद्यालय, यांच्यासह इतर शाळा ३१ मार्चपर्यंत बंद असणार आहे.  अजुन शासना कडून बंद पत्र अजुन काही शाळां मिळाले नसुन मिळाले कि ते पण बंद करणार आहे.

चार कोचिंग क्लासेस आज पासुन बंद

रावेर शहरातील विद्यादान कोचिंग क्लासेस,शारदा कोचिंग क्लासेस,श्रीगणेश कोचिंग क्लासेस,व इतर कोचिंग क्लासेस आज पासुन बंद करण्याचा निर्णय क्लास चालकांनी घेतला आहे.

शासनाच्या आदेशाचे सर्वांनी पालन करावे

कोरोना संसर्गजन्य आजार आहे म्हणून शासनाने सर्व खाजगी व शासकीय शाळांना उद्यापासुन सुटी जाहिर केली आहे. कृपया सर्वांनी या आदेश्याचे पालन करण्याचे अवाहन पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांनी केले आहे.

Protected Content