जळगाव शहरात लवकरच मनपातर्फे महिलांसाठी समुपदेशन केंद्र

26 7 2019 6

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव महापालिकेकडे लवकरच समुपदेशन केंद्र सूरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी अजिंठा विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे , महापौर सिमा भोळे, बेटी बचाव अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र फडके, महापालिकेचे आयुक्त डॉ.उदय टेकाडे आदी  उपस्थित होते.

महिलांना सामाजिक, कादेविषयक व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम बचटगटांमार्फत सुरु आहे. त्यांमुळे बचत गटांचे बळकटीकरण होत त्यांना सर्वार्थाने सक्षम करण्यासाठी महिला आयोग प्रयत्नशील असल्याची माहिती रहाटकर यांनी पुढे सांगितले. त्या प्रज्ज्वला योजनेंतर्गत जिल्हा दौऱ्यावर आल्या असता पत्रकारांशी बोलत होत्या.जळगावात मनपाकडील होणारे समुपदेशन केंद्र हे शहरातील महिलांना सोयीचे होईल अश्या ठिकाणीच राहणार असून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य तसेच पाठपुरावा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून राहिल असेही रहाटकर यांनी यावेळी सांगितले. समुपदेशन केंद्रासाठी MSW सारख्या समाजकार्याचे शिक्षण झालेल्या व्यक्तींची निवड करण्यात येईल. समुपदेशन केंद्र व्यवस्थित चालावे समाजातील सर्व महिला घटकांना समान न्याय मिळावा कुणीही महिला न्यायापासून वंचित राहू नये म्हणून महापालिकेसोबतच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , महिला बाल विकास विभाग यांचे सहकार्य असणे आवश्यक असून तशी त्यांच्यावर ती जबाबदारी टाकण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.बचत गटासह महिलांच्या विकासासाठी फेब्रुवारी २०१९ पासून प्रज्ज्वला योजना सुरु करण्यात आली असून या अंतर्गत बचतगटातील महिलांना शिबीराच्या माध्यमातून सक्षम बवविण्यात येत आहे. या शिबीरात महिलांचे हक्क, कायदे, शासकीय योजनांसह विविध माहिती देत बचतगटांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तीन टप्प्यात महिलांना प्रशिक्षण देण्यात येत असून एक जिल्हा एक क्लस्टर निवडून त्या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत ११ जिल्ह्यात प्रशिक्षण घेण्यात आले असून जवळपास ५० हजार महिलांना याचा लाभ झाला आहे. महिला सक्षमिकरणासाठी विविध मार्गाने काम करण्यात येत असून पंढरपूर वारीतही आयोगाची दिंडी सहभागी झाली होती. या दिंडीत महिलांना कायदे, त्यांचे हक्क याबाबत पोस्टर, चलचित्र, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. वारीत सामिल झालेल्या दीड लख महिलांना अयोगाच्या माध्यमातून सिनेटरी पॅड वाटप करण्यात आले. या दिंडीची दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेत प्रत्यक्ष भेटीसाठी बोलवून देशातील माता बघिनींसाठी संदेश देखील दिला असल्याचे त्या म्हणाल्या.

Protected Content