राज्यात माझी वसुंधरा अभियानांतर्गत चिनावल – पहुरची निवड

रावेर, प्रतिनिधी । राज्यस्तरावरुन माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जळगाव जिल्हातुन पहुर व चिनावल (ता .रावेर) निवड करण्यात आली आहे. उद्या दि ५ रोजी राज्यभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड झालेल्या ग्रामपंचायतचा ऑनलाईन सन्मान सोहळा होणार आहे.

उद्या जागतीक पर्यावरण दिनानिमित्त माझी वसुंधरा संदर्भात ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीप आदी उपस्थितीत ऑनलाईन संपन्न होणार आहे. अभियानांतर्गत सन २०२०-२१ मध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेअंतर्गत ग्रामपंचायतींच्या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये चिनावल ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

राज्यस्तरावर निवड झाल्याचा आनंद:- बीडीओ
चिनावल गावाची राज्यस्तरावर निवड झाल्याचा आनंद आहे. पंचतत्वांवर आधारित सर्व स्तरातील कामे त्या गावात झाली आहे. माझी वसुंधरात महाराष्ट्र भरातुन तीन गावांची निवड झाली असुन उद्या चिनावला कितवा क्रमांक मिळेल हे कळणार आहे. आमच्या सर्व टिमने यासाठी खुप मेहनत घेतली आहे. शासनाचे आदेश माझी वसुंधरा संदर्भात वेळो-वेळी फॉलो केल्याने योग्य नियोजन केल्याने निवड झाल्याचा आनंद असल्याचे गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी सांगितले.

Protected Content