अंतुर्ली रोडवरील दोन ढाब्यांवर पोलीसांचा छापा; देशी दारूसह मुद्देमाल हस्तगत

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील अंतुर्ली गावाच्या रस्त्यावरील एका ढाब्यावर पोलीसांनी धडक कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला असून मुद्देमालासह देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली दुरक्षेत्र परिसरात असलेल्या फौजी ढाबा व अपना ढाबा या दोन ठिकाणी मुक्ताईनगर पोलीसांनी छापा टाकून साडेचार हजार रूपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केला आहे. तर जुगार अड्ड्यावर धाड टाकून २ हजार ३५० रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक खताळ, पोउनि काकडे, पोहकॉ गणेश मनुरे, पो.ना. गजमल पाटील, लतीफ तडवी, पो.कॉ. राहून बेहेनवाला, सुनिल नागरे, विशाल पवार यांनी कारवाई केली.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!