तरुणीला धमकावले : भुसावळच्या नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ प्रतिनिधी । तरूणीला धमकी दिल्या प्रकरणी राज उर्फ सनी रवींद्र खरात या भुसावळच्या नगरसेवकाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३ मार्च रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास फिर्यादी राजश्री सुरवाडे या रेल्वे दवाखान्यात जवळून जात असताना त्यांना संशयित राज खरात यांनी त्यांच्या वडिल, काका व भावाच्या खुनातील आरोपी मयुरेश सुरवाडे यांचा आई व भाऊ रिंकू यांचा पत्ता विचारला. तसेच त्यांचा मोबाईल क्रमांक दे अशी मागणीदेखील केली. त्यावेळी राजश्री सुरवाडे यांनी माझ्याकडे त्यांचा पत्ता नसल्याचे सांगितले. त्यावेळी राज याने माझ्या वडिलांचा ६ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवसापर्यंत पत्ता व मोबाईल क्रमांक दिला नाही तर बघून घेईल अशी धमकी देऊन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी राजेश्री सुरवाडे यांनी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून यावरून भाग – ६ , गु. र. नं. ४४/ २० भादवि कलम २९४ , ५०४, ५०६, ४२७ ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content