यावल येथे पाच बंद घरांतून रोख रक्कमेसह सोन्याच्या दागीन्यांची चोरी

WhatsApp Image 2020 01 11 at 11.24.13 AM

यावल, प्रतिनिधी | येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पाच बंद घरे फोडून सुमारे १ते २ लाख रूपयांसह दागीने चोरून नेल्याची घटना घडली असुन परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात पोलिसांना माहीती कळविण्यात आली असल्याचे कळते.

या संदर्भातील मिळालेली माहीती अशी की, यावल शहरातील कृष्णतारा नगरमध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी पाच बंद घरांना लक्ष केले असुन यातील छत्तिसगढ येथे सी.आर.पी.एफ.मध्ये नोकरीस असलेल लतीफ नामदार तडवी यांची कुटुंब या परिसरात राहात असुन त्यांच्या पत्नी जरीना लतीफ तडवी या परसाडे तालुका यावल येथे यात्रेनिमित गेल्या होत्या. तसेच त्यांचे शेजारी शावखा आमद तडवी कुटुंबासह यात्रेनिमित परसाडे गावी गेले होते. त्यांचे बंद घरपाहुन चोरट्यांनी प्रमुख दरवाज्याचे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला. घरातील कपाटामध्ये असलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. घरफोडीच्या या घटनेमुळे परिसतील नागरीकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या अज्ञात चोरट्यांनी एुकुण पाच बंद घरांना लक्ष केले आहे. चोरट्यांची संख्याही चार ते पाच असुन त्यांच्याकडे एक मोटरसायकल असल्याचे या घटनेपासुन जवळ असलेल्या शाळेच्या सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

Protected Content