यावल येथे हिंदू-मुस्लीम एकता मंचतर्फे गरजूंना अन्नदान

यावल प्रतिनिधी । येथील हिंदु मुस्लीम एकता मंचतर्फे लॉकडाऊनच्या कालावधी शहरातील गोरगरिबांना अन्नदान करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूंच्या पार्श्‍वभूमीवर लावण्यात आलेल्या संचार बंदीमुळे सर्वसामान्य गोर गरीब नागरिकांना घरपोच जेवण वाटप करण्यात येत आहे. हिंदू-मुस्लीम एकता मंच या समाजसेवी युवकांच्या गेल्या दहा दिवसापासून मोलमजुरी करून आपल्या पोटाची खळगी भरणार्‍याच्या हाताला काम नसल्याने उपाशी राहण्याचा प्रसंग येऊ नये या सामाजिक दृष्टिकोनातून यावल शहराचे हिंदू-मुस्लीम तरुण युवकांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या कमिटीच्या वतीने शहरातील विविध परिसरात रोज संध्याकाळी मोलमजुरी करणार्‍या गोरगरिबांना पोटभर जेवण वाटप करण्यात येते. या कमिटीच्या वतीने शहरातील श्रीराम नगर, पंचशील नगर, आझाद नगर,गोळीबार, बाबा नगर,सईद पुरा, कुंभार खंड, इस्लामपुरा, बाबुजी पुरा, प्रताप नगर,खिरनिपुरा, सुंदर नगरी, शिवाजी नगर,भिलवाडी, डांगपुरा, अकसा नगर आदी भागांमध्ये हिंदु मुस्लीम एकता मंच तर्फे जेवण वाटप करण्यात येत आहे..
कदीर खान,राजेश करांडे,नेहाल सर,चेतन पाटील, दिवाकर फेगडे, अजहर शेख, अस्लम सर,ईकबाल खान,अकिल अहमद, कलीमोद्दीन शेख,चेतन करंडे,जुबेर सर,नासीर पटेल, हाफिज खान,ईरफान शेख,शोएब अहमद, उस्मान खान, प्रंजल सोनवणे, खुशाल करांडे,अ.नबी, हर्षल पाटील, अक्रम पटेल आदींनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

संचारबंदी च्या सलग अकराव्या दिवशी देखील यावल शहरातील तरुणांनी स्थापन केलेल्या हिंदू मुस्लिम एकता मंचच्या वतीने गोरगरिबांना जेवण वाटण्याचे आहे सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये या हिंदू मुस्लिम एकता मंचच्या एकात्मतेचे व कार्याचे सर्व पातळीवर कौतुक करण्यात येत करण्यात येत आहे

Protected Content