आता रोड दुरूस्तीची कोणतीही आशा नाही : गुप्तांनी रस्त्यांनाच वाहिली आदरांजली !(व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी  । जळगाव शहरातील रस्त्यांची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की, ते आता कधी दुरूस्त होतील की नाही याबाबत शंका वाटत आहे. याचमुळे आपण रस्त्यांना आणि याचे नियोजन करणार्‍या प्रशासकीय यंत्रणेला श्रध्दांजली अर्पण करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी दिली आहे. 

 

प्रसारमाध्यमांशी बोलतांना दीपक कुमार गुप्ता यांनी सांगितले की,    जर एखाद्या घरात कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्या घरातील जेष्ठांची भेट घेऊन सांत्वना केली जाते त्याच प्रमाणे आम्ही शहरातील रस्त्यांचा मृत्यू झाल्याने मनपाचे वरिष्ठ अधिकारी म्हणून आयुक्त यांची भेट घेऊन त्यांच्याजवळ शोक व्यक्त करत सांत्वना दाखवली. आयुक्त दालनात  बैठे आंदोलन देखील केले. या आंदोलनात राहूल जगताप,अमोल कोल्हेअजय महाडिक, विलास सांगोरे, राहूल लोढा, समाधान पाटील, राजेंद्र नन्नवरे, योगेश कदम, महेश पाटील , दीपक बाविस्कर आदींचा समावेश होता. नियोजनाच्या अभावाने शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असल्याचे श्री. गुप्ता यावेळी आयुक्तांच्या लक्षात आणून दिले. यानंतर त्यांनी रस्त्यांनाच आदरांजली वाहिली.

 

 

भाग १

https://www.facebook.com/508992935887325/videos/2859518297644478

भाग २

https://www.facebook.com/508992935887325/videos/968273467358801

 

Protected Content